Posts

आम्ही ना मराठी माध्यम वाले..

Image
आम्ही ना मराठी माध्यम वाले.. बे एके बे, पाच त्रिक पंधरा वाले..  'या कुंदेंदुतुषारहारधवला' आणि 'एक साथ नमस्ते' वाले..  'भारत माझा देश आहे' आणि 'सारे भारतीय माझे बांधव' वाले..  आम्ही हातचा धरणारे आणि बाकी सोडणारे..  क, ख, ग, घ पासून य, ज्ञ आणि अं,अ: वाले..  अल्जेब्रा अँड जॉमेट्री नाही; बीजगणित आणि भूमिती वाले..  बालवाडी ते दहावीच्या एसएससी बोर्ड वाले.. आम्ही टि. म. वि. च्या इंग्रजी आणि गणिताची प्रशस्तीपत्रक मिरवणारे.. हिंदी, मराठी आणि मोडक्या तोडक्या इंग्रजीत का असेना वक्तृत्व स्पर्धेची बक्षीसं मिळवणारे..   आम्ही परिसर आणि नागरिक शास्त्र वाले..  आम्ही गोट्या, श्यामची आई आणि फास्टर फेणेवाले..  आम्हीच चंपक, ठकठक आणि चांदोबा वाचणारे..  'सातच्या बातम्या' आणि नंतर 'वादळवाट' पहाणारे..  आम्ही प्लेलिस्ट मध्ये Eminem आणि रेहमान शेजारी वसंतराव आणि अभिषेकी ठेवणारे.. आम्ही मंटो आणि गालिब वाचताना ही पुलं आणि कुसुमाग्रज काळजात जपणारे.. लगोरी, आबादुबी, लंगडी आणि पाच तीन दोन वाले.. आम्ही 'स्मशानातील सोनं' आणि 'अंतू बर्वा' वाले.. आम्ही ना मर

जणू अंगी श्यामल शेला..

Image
काहीतरी विलक्षण आहे ह्या नावामध्ये; ह्या व्यक्तिमत्वाकडे मी देव ह्या संकल्पनेतून कधी पाहूच शकलो नाही; मी कायम कृष्णाला माणूस म्हणून पहात आलोय. कारण देवावर श्रद्धा असते आणि माणसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता. मी ठामपणे ह्या मताचा आहे 'जिथे श्रद्धा असते; तिथे किंतु परंतु नसतात.. जिथे उत्सुकता असते तिथे उलट सुलट प्रश्नांना, शंका कुशंकांना वाव असतो.. ‘, हा कृष्ण कायम मला बुचकळ्यात पाडत आला आहे. त्याच्या बद्दल मला हजार प्रश्न पडतात; त्यामुळे त्याच्यावर श्रद्धा आहे असं नाही मी ठामपणे म्हणू शकत. पण काहीतरी आहे ह्या व्यक्तिमत्वामध्ये एवढं नक्की; काहीतरी प्रचंड आकर्षित करणारं, विचारांवर गारुड घालणारं!!..  तान्हेपणी देवकी वसुदेवापासून वेगळा झालेला कृष्ण, नंदा घरी वाढलेला कृष्ण, गोपिकांसमवेत रमलेला कृष्ण, राधेच्या प्रेमात पडून तिच्यासाठी आयुष्यातली एक अतिमहत्वाची जागा तेवढ्याच निष्ठेने रिकामी ठेवणारा कृष्ण, रुक्मिणीचं प्रेम स्वीकारून अमरावतीशी वैर घेणारा कृष्ण, जामवंती, सत्यभामेसाठी त्यांचा त्यांचा म्हणून असलेला हक्काचा कृष्ण, सुदाम्यासाठी सन्मित्राचं उदाहरण प्रस्थापित करणारा कृष्ण, द्रौपदीची

तू सांब भोळा; उमा पार्वती मी..

Image
कायम हिमाच्छादीतच प्रदेश तो; त्यामुळे अंग गोठवून टाकणारी थंडी सदोदीत पडलेली असायची; पण आज हवेत खूपच गारवा जाणवत होता. हिमनगाच्या सर्वात उंच शिखरावर आपल्या नेहमीच्या शिळेवर खोल दरीच्या दिशेने पहात महादेव निवांत बसले होते. नेहमी प्रमाणेच शांत, धीर गंभीर मुद्रा, भस्मामुळे कापरासारखं चमकत असलेलं अंग, पाठीवर लांब पसरलेल्या जटा, आणि गळ्यातून खांद्यावर रुळणारा वासुकी. पण नेहमीची योगशांतता चेहऱ्यावर दिसत नव्हती. काहीसा थकलेला होता चेहरा. गहन विचारात असावेत. लांब एका टेकडीवर शेकोटीचा धूर आणि मुंगी एवढे काही गण नाचगाणी करताना दिसत होते. संबळ, नगारे ह्यांचा पुसटसा ध्वनी येत होता. कैलासावर दूरवर पर्यंत पथ दिव्यांची रोषणाई दिसत होती. खूप वर्षांनंतर कैलासावर लग्नसोहळा घडला होता. सगळे गण त्याच आनंदात फेर धरून नाचत होते. त्यांना पाहून महादेवांच्या चेहऱ्यावर पुसटसं समाधानाचं स्मित झळकलं. त्यांच्यावरची नजर काढून त्यांनी आकाशातल्या चंद्रावर स्थिरावली. सप्तमीचा चंद्र आकाशात सुस्तावला होता. त्या चंद्राच्या शीतल प्रकाशात आधीच शुभ्र असलेला हा कैलास अजूनच स्फटिका सारखा चमकत होता. तेवढ्यात पैंजणाचा ओळखीचा आवाज

म.. मराठी, मी.. मराठी

Image
तुझ्या शब्दगंधात मोहरावे कळ्यानीं नेसल्या लावण्यवती भरजरी दुशाली तुझ्या अमृते पाझरे ज्ञानगंगेचा घडा तू स्वधर्म राखिण्या पेटविल्या मशाली तू तुकोबाच्या जणु अभंगातून हासली अन दासबोधातल्या पंक्तित मिसळली ज्ञानेश्वरी झालीस कधी अश्लाघ्य बोली जणु अमृताच्या पैजा जिंकण्या मिळाली आईच्या अंगाईत तुझा सायस्पर्ष जाणवे सखीचे पहिले प्रेमपत्र रात्र अजूनी जागवे बडबड गीतात तुला पहिल्यांदा भेटलो मी नंतर आयबहिणीच्या शिव्यांमध्ये पाहिली तू फक्त भाषाच नाहीस, तू एक संस्कार आहेस शब्द सरस्वतीच्या गळ्यातला अलंकार आहेस तुझ्या पोटी जन्मलो हे मला लाभले भाग्य मोठे 'मराठी' तुझी पुण्यपालखी अगा आजन्म घेतली ©अजिंक्य ठाकूर  

शापित अप्सरा; जी महाराणी बनू शकली असती..

Image
  रोमन मायथॉलॉजी मध्ये ममत्व आणि सौंदर्याची देवी म्हणून डायनाची ओळख आहे. देवांच्या अधिपती ज्यूपिटरची अतिशय सुंदर, निरागस आणि सालस मुलगी, प्रकाशाचा देव अपोलोची बहीण, वनांमध्ये रमणाऱ्या, चंद्रासारख्या शीतल असलेल्या डायनाचं अरण्यात आलेल्या एका शिकाऱ्यावर प्रेम जडतं. दोघांमध्ये प्रेम संबंध दृढ होतात. पण डायनाच्या भावाला अपोलोला हे मान्य नसतं. तो कारस्थान करून डायनाकरवी तिच्या त्या प्रियकराचा खून करवतो. त्या मागचं कारण एकच असतं; डायना कायमस्वरूपी अविवाहीत; कुमारिका राहावी, प्युअर असावी, व्हर्जीन म्हणून ओळखली जावी आणि तसं होतं देखील; आजही रोमन मायथॉलॉजी मध्ये प्युरिटी आणि व्हर्जिनिटी साठी डायनाला प्रमाण आणि साक्ष मानलं जातं. हीच व्हर्जिनिटी, प्युरिटी तिच्याच सारख्या एका दुसऱ्या डायनासाठी मात्र अभिशाप बनली. त्या व्यक्तीला संपूर्ण दुनिया आज "प्रिन्सेस ऑफ व्हेल डायना" म्हणून ओळखतं.  आपल्यातल्या खूप कमी जणांना माहीत असेल अमेरिकन मुलाखतकार Oprah Gail Winfrey च्या मुलाखती ह्या जगात सर्वात महत्वाच्या आणि अभ्यासू मुलाखती म्हणून ओळखल्या जातात. जगभरातल्या मोठमोठया हस्ती इथे आपलं मन मोकळं करत

अंबर से आई है परियों की रानी..

Image
  कोणी मला तुझी सर्वात आवडती हिरोईन कोण असं विचारलं तर आता माझी उत्तरं तापसी, अनुष्का, साई पल्लवी, समॅन्था वगैरे असतील पण मला गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन वगैरे उत्तर द्यायला सांगितलं तर मनात कुठल्यातरी कोपऱ्यात एक उत्तर आहे जे मला माहित्ये माझं पहिलं क्रश "करिष्मा कपूर" आणि ती ही "राजा हिंदुस्तानी" मधली. आज इंस्टाग्रामवरची करिष्माची पोस्ट वाचली 'राजा हिंदुस्तानी' ला २५ वर्ष झाली. त्यासाठी तिने ती पोस्ट लिहिलीये त्यातलं गाणं ही शेअर केलंय.  आईशप्पथ बाई त्या फिल्म मधल्या प्रत्येक गाण्यात ज्या दिसल्या आहेत त्यासाठी फक्त आणि फक्त एकाच शब्दात त्याचं वर्णन करता येईल "अद्वितीय"!!. धर्मेश दर्शनची फिल्म होती राजा हिंदुस्तानी. तसं पाहिलं तर गोष्ट अगदी सरधोपट होती. अगदी नेहमीच्या साच्यातली. पण माझं लक्ष आणि माझी नज़र त्या काळात आणि आजही त्या सिनेमात कुणावर स्थिरावलेली असेल तर ती केवळ नं केवळ करिष्मावर.   बाईंच्या अभिनयाला बऱ्याच मर्यादा होत्या.. आहेत. पण तो निराळा भाग. पण माझ्यासाठी त्या सिनेमातला तिचा वावर हा जादुई आणि स्वर्गस्थ अप्सरेसारखा होता.    कधी कधी एखा

तू आहेस म्हणून आम्ही आहोत..

Image
  माझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्याच आया, बहिणी, मैत्रिणींसाठी..  कदाचित उशीर झालाय; पण तुला एक सांगायचं होतं.. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. कुणी सांगितलं असेल नसेल तुला आजपर्यंत हे सगळं..  पण मानलं किती जणांनी आहे; ह्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्हंच आहे.. अपेक्षांचं ओझं आहे बाई तुझ्यावर, प्रेमाचं बर्डन ही आहे.  त्या किती पूर्ण करतेस, न करतेस ह्यावर आमचं बारीक लक्षही आहे..  तुला क्षणा दर क्षणाला स्वतःला सिद्ध करावं लागतंय आणि हो!; सुरक्षीतही ठेवावं लागतंय..  म्हणून एकदा आठवण करून द्यायची आहे तुला; तू आहेस म्हणून आम्ही आहोत. तुला एक गंमत सांगू; तुझ्या बाबतीत आम्हाला तुझ्याच उपमा सुचतात अगं..  आता तू सुंदर आहेस हे सांगायला आम्हाला लक्ष्मी आणि रतीची नावं घ्यावी लागतात..  तू स्वार्थी निघालीस तर आमच्या उदाहरणात मंथरा आणि शूर्पणखा कायम ठरलेल्या..  सोयराबाईंसारखी महत्वकांक्षी ही तू आहेस; आणि आऊसाहेब जिजाऊं सारखी धोरणी ही..  तुझ्या रूपाने आम्ही यशोदेची आणि देवकीची ममता ही पाहिली..  पूतनाच्या आणि होलिकेच्या दहनाची गोष्ट ही कीर्तनांमधनं ऐकली..  राधे, मीरेचं प्रेम ही तुझ्याकडून शिकलो; आणि कैकयीच्या ३ वचनांचं